कुक्कुट पालनातील उन्हाळी व्यवस्थापन
महाराष्ट्रातील बर्याच भागात शेतीला जोडधंदा म्हणून करण्यात येणारा व्यवसाय म्हणजे
कुक्कुट पालन. कमी दिवसामध्ये चांगला फायदा मिळवून देणारा व्यवसाय म्हणून याकडे बघितल्या
जात होते तूर्तास तरी परिस्थिति बदललेली आहे, कारण कोणत्याही
मालाचे भाव हे “मागणी आणि पुरवठा” या गुणोत्तरावर
अवलंबून असते. कुक्कुट पालन या क्षेत्रामध्ये कंपन्यांचे
प्रमाण खूप वाढले आहे परिणामी बाजारपेठेमध्ये मालाचा पुरवठा मोठ्याप्रमाणात
असतो परिणामी बाजारभाव हा कमी राहतो. प्रत्तेक नाण्याच्या
जस्या दोन बाजू असतात तस्या या व्यवसायामध्येही
आहेत.
कोंबडी
ही उबदार रक्त असलेल्या प्रजातीमध्ये मोडते आणि महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते. यामुळे
बरेचसे शेतकरी हे उन्हाळ्यामध्ये हा व्यवसाय
बंद ठेवण्याचा पर्याय निवडतात. परिणामी बाजारपेठेमध्ये मालाची आवक कमी होते. या
कारणास्तव मालाची वार्षिक आकडेवारी जर बघितली तर उन्हाळ्यामध्ये उत्कृष्ट भाव
भेटण्याची शाश्वती असते असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही .खरे तर शेतकर्याला उन्हाळा सोडून राहिलेल्या आठ महिन्यांमध्ये या
व्यवसायात जेवढा नफा होतो त्यापेक्ष्या जास्त नफा हा उन्हाळ्यातमधील चार महिन्यात होतो फक्त ह्या दिवसांमध्ये योग्य ते व्यवस्थापन
करणे आवश्यक असते .
“ब्रूडिंग
“ हा या व्यवसायातील सर्वात महत्वाचा
टप्पा. पहिल्या दोन आठवड्यांमध्ये कोंबड्यांची घेतलेली काळजी म्हणजे ब्रूडिंग असे
म्हंटले तरी चालेल . परंतु उन्हाळ्याच्या खोपीमध्ये हे व्यवस्थापन अगदी सोपी असते
कारण जसे वातावरण कोंबड्यांना ब्रूडिंग च्या वेळी हवे असते तसे नैसर्गिक रित्या
उपलब्ध असते. परंतु जसे ब्रूडिंग संपले तसे “ उन्हाळी व्यवस्थापन वा समर मॅनेजमेंट
“ चालू होते. समर मॅनेजमेंट मध्ये घ्यावयाची
काळजी..
·
उन्हाळ्यातील खोप टाकतांना 1.2-1.4
स्के. फु./कोंबडी या हिशोबांनी टाकायचे
जेणे करून पक्ष्यांना आवश्यकतेनुसार जागा
मिळेल.
·
10 ते 5 खाद्य विश्रांती :-
कोंबड्यां ह्या उष्ण आहेत सोबतच खाद्य हे
ही उष्ण असल्यामुळे उन्हाच्या वेळी खाद्य देणे टाळावे, नाहीतर शरीरातील तापमान वाढून मरीच्या प्रमाणातही वाढ होते. त्यामुळे 14
दिवसांनंतर 2-2 तास खाद्याची विश्रांती
देणे चालू करावे आणि हळू हळू 20 व्या दिवसांनंतर 10 ते 5 पर्यंत विश्रांती द्यावी.
जेणे करून उन्हामध्ये शरीरातील तापमानात वाढ होणार नाही .
·
उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त
वाढण्यास सुरवात झाल्यानंतर पाणी पिण्याचे प्रमाण वाढते जे शरीराचे तापमान थंड
ठेवण्यास मदत करते त्या पाण्यासोबतच vit.
C असलेल्या औषधी किंवा
इलेकट्रोलाइट द्यावे जे उष्णतेवर चांगले काम करते.
·
उन्हाळ्यामध्ये वारा हा जोरात आणि
उष्ण असतो जो पक्ष्यांना थेट लागला तर पक्ष्यांना हानी होण्याची शक्यता असते त्याच उष्ण वार्याला जर थंड वार्यामध्ये
बदलण्यात आले तर त्याचा योग्य आणि छान
फायदा कोंबड्यांच्या वाढीसाठी होतो. त्याकरिता जाळीला दोन्ही बाजूंनी जवळपास 6 फूटाचा
बोंदरीचा परदा लावावा आणि त्यावर
टिंबक च्या नळीने पाणी सोडावे जेणे करून तो परदा गरम वार्याला थंड वार्यात
बदलण्याचे काम करेल. सोबतच या ओल्या परड्यांमुळे आतमधील आद्रता वाढेल आणि वातावरण
मंद होणार अश्या परिस्थितीत आतमध्ये जर पंखा चालू असेल तर त्याचा उत्तम असा फायदा
कोंबड्यांना मिळतो.
·
छत थंड कसे राहील ह्यासाठी छतावर
मायक्रो स्पिंकलर लावावे नाहीतर तुराट्या
वा गवत ज्याची उपलब्धता असेल ते छतावर आथ रून द्यायचे जे छत थंड राहण्यास मदत
करेल.
·
कोंबड्या ह्या जास्तच ला-ला
करत असतील तर अश्यावेळी अर्ध्या तासात 5-10 मि. साठी “फोगर” चालवावे
शक्यतोवर फोगर हे 30 दिवसांनंतर वापरावे जेणे करून कोंबड्यांमध्ये घरघर आवाज येता कामा नये
सोबतच आणखी एक गोष्ट लक्ष्यात ठेवायची की दुपारच्या
वेळी कोंबड्यांना 10 ते 5 खाद्य नसेल अश्या परिस्थितीत संध्याकाळी आणि रात्री
शेडमध्ये चांगल्या प्रकारे उजेड असणे आवश्यक आहे जेणे करून पक्ष्यांना व्यवस्थित
खाद्य खाता येणार .
येवढे केले तर
उन्हाळ्याची कोंबळ्यांची वाढ ही जोराने होणार आणि मरीवरहि अंकुश राहील.
श्रीकांत तायडे
मो. ९९६०२६६२१६
ईमेल : shrikant.tayade9890@gmail.com
वेबसाइट : cheapestpoultryfarminginindia.blogspot.in
0 comments:
Post a Comment